web-ads-yml-728x90

Breaking News

नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवड लांबतच चालली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चर्चांवर चर्चा आणि बैठकांवर बैठका पार पडत आहे. पण तरीही पुढचे महराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? हे समोर येत नाहीय. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव जरी निश्चित मानलं जात असलं तरी त्यांचं नाव आणखी जाहीर होत नाहीय. अशा सगळ्या परिस्थितीत आता नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळतीय.  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सगळे अधिकार दिलेले आहेत. नुकतीच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतही केवळ चर्चेचं गुऱ्हाळंच पार पडलं. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. नव्या अध्यक्षनिवडीसंदर्भात होत असलेला विलंबावरुन सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली.

 

 

 

 

No comments