web-ads-yml-728x90

Breaking News

मराठा सेवा संघ मुरबाड तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली. तसेच मराठा सेवा संघ मुरबाड तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुरबाड मुख्य बाजारपेठेतील राजमाता जिजाऊ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जिजाऊ वंदना गाऊन जयंती साजरी करण्यात आली.

No comments