web-ads-yml-728x90

Breaking News

विना मास्क फिरणारे पुणे पोलिसांच्या ‘रडार’ वर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

कोरोनाचं संकट पुण्यात पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. बुधवारी दिवाळीनंतर प्रथमच सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर अधिक कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments