web-ads-yml-728x90

Breaking News

सातपूर येथील 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड'च्या निवासी वसतिगृहाचे भूमिपूजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  नाशिक

शंभर हातांनी घेऊन, हजारो हातांनी दान देण्याची भारतीय परंपरा आहे. यास अनुसरून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दृष्टिबाधित दिव्यांगाना आत्मनिर्भर करण्याचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सातपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, नाशिकच्या निवासी वसतिगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी नॅब महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष देवकिसनजी सारडा, नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, नॅब महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुर्यभान साळुंखे, नॅब महाराष्ट्राचे विश्वस्त अशोक बंग, मानद महासचिव गोपी मयूर, नॅब नाशिकचे चेअरमन व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल यांच्यासह नॅबचे पदाधिकारी, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, दृष्टिबाधित व दिव्यांगांना आत्मविश्वासाने जगण्याचे शिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व दृष्टिबाधित मुलींनी रोप मल्लखांबाचे दाखवलेले प्रात्यक्षिक सर्वांना प्रेरणा देणारे आहे. तसेच दानशूर व्यक्तींमुळेच नॅबसारख्या सामाजिक संस्थांचे कार्य अविरतपणे सुरू राहण्यासाठी आश्रयदात्यांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी केले आहे.

No comments