BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर
असंघटित कष्टकरी कामगार संघटना हीं अनेक वर्षापासून असंघटीत क्षेत्रातील नाका व बांधकाम कामगार घरकाम कामगार महिला यांच्या सोबत काम करत आहे.1996 चा इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 आणि महाराष्ट राज्य घरेलू कामगार कल्याणकारी मंडळच्या माध्यमातून जनजागृती काम करत आहे,अनेक कामगारांची नोंदणी उपरोक्त मंडळात केली आहे. प्रथम या सामजिक संस्थेच्या माध्यमातूननाका व बांधकाम कामगारांना कौशल्य विकास 10 दिवशीय ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेज्या मध्ये आधुनिक व सुरक्षित पणे कसं काम करायला पाहिजे हे शिकविण्यात आले.
प्रशिक्षनां मध्ये शेकडो नाका व बांधकाम कामगार यांनी सहभाग घेतला..प्रशिक्षण पूर्ण केले. आज 22/02/2021 रोजी म्हरळगाव ता कल्याण जिल्हा ठाणे .संघटनेच्या कार्यालय मां अजित बनसोडे प्रथम (प्रशिक्षण प्रमुख) व संघटना अध्यक्ष सुनिल अहिरे यांच्या हस्ते कामगारांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी उत्तम साबळे मीरा सपकाळे वैशाली कांबळे पद्माकर अहिरे प्रशिक्षणार्थी किसन म्हस्के,भगवान खरंसान,सुरेश आवारे,मोहन कांबळे,बेबी नाईक,सबिना डिकॉसटा,गुंफा बांई सूरडकर,पोपट कांबळे,श्याम धांडे,सुरेश आवारे,कौसाबाई थोरात, अरुण पाटोळे,ईत्यादि उपस्थित होते.
Post a comment