web-ads-yml-728x90

Breaking News

‘मां की रसोई’ ; ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोलकत्ता

पश्चिम बंगालच्या निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांचं सरकार ‘मां की रसोई’ हे योजना घेऊन येत आहे. या योजनेअंतर्गत गरीबांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना डाळ, भात, एक भाजी आणि अंड देण्यात येणार आहे. सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्य सचिवालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ममता बॅनर्जी या योजनेचं उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत सध्या कोलकात्यातील १६ बोरो कार्यालयात दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी जवळपास एक हजार लोकांना दुपारचं जेवण देण्यात येणार आहे. हळूहळू कोलकात्याच्या बाहेरही या योजना सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

No comments