0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर

आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास सकल मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मातंग समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष देऊन पुर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, गणेश ढोबळे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, राजू रोकडे, सतीश नवगीरे, सतीश बोरुडे, गुलाबराव गाडे, आशाताई ससाणे, सुनिल भोसले, अनिल ससाणे, महादेव नेटके, साहेबराव काते, आकाश लोखंडे, आकाश साबळे, भगवान जगताप आदी उपस्थित होते.

सुनिल सकट म्हणाले की, अनेक वेळा आंदोलन करुनही अद्यापि मातंग समाजाला न्याय मिळालेला नाही. समाजाचे विविध प्रश्‍न सोडवून मातंग समाजाला प्रवाहात आनण्याचे काम राज्य सरकारने करण्याची गरज आहे. लहुजी वस्ताद साळवे अनेक क्रांतीकारक घडविले. स्वातंत्र्याच्या क्रांतीचे महानायक म्हणून त्यांची प्रतिमा असून, युवकांनी त्यांच्या देशभक्तीचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क व ड नुसार वर्गवारी करुन मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र्य आरक्षण मिळावे, आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्या संगमवाडी येथील समाधी स्थळी स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने शासकीय पुरस्कार सुरु करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

Post a Comment

 
Top