0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  औरंगाबाद

अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम सुरू आहे. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनेही या संदर्भात पत्रकार परिषदेत लवकर लोकार्पण करण्याची मागणी करण्यात आली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहागंज परिसरात लोहपुरुष सदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णकृती पुतळ्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून आढावा घेतला. यामध्ये पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आणि मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची देखील उपस्थिती होती. आता लवकरच या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Post a Comment

 
Top