web-ads-yml-728x90

Breaking News

शिवराज्य प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती महोत्सव...

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - रायगड

दीपप्रज्वलनाने शिवरायांच्या जयघोशात महेशजी गोठल,कुलकर्णी सर, व अनंत जाधव या वरिष्ठ मंडळी व शिवराज्य प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष शरद शिगवण, सरचिटणीस मनोज जाधव व महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार सर्व शिवराज्य प्रतिष्ठान च्या शिवकन्या व उपाध्यक्ष रोहन गजमल, यांच्या हस्ते करण्यात आलं,विशेष सहकार्य शाळेतील विद्यार्थी यांना वह्या वाटप वितरण सोहळा समाजसेवक श्रीकांत राऊत ह्यांच्या हस्ते तर शिवराज्य प्रतिष्ठान यांच्या विचारधारेला अनुसरून हा कार्यक्रम प्रामुख्याने आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे शिवजयंती लोकडाऊन दरम्यान अनेक विद्यार्थी आपलं अभ्यास ऑनलाइन करत होते व त्यांना जास्तीत जास्त गरज नोटबुक  वह्या ची भासत होती हे लक्षात घेऊन शिवजयंती च औचित्य साधून हा उपक्रम शैक्षणिक म्हणून घेण्यात आला व प्रमुख अतिथी म्हणून उदयदादा जाधव आणि महाडिक आहे  यांनी संबोधित केले तसेच शिवकन्या प्राची महाडिक यांनी शिवगर्जना देऊन अनेकांची मने गगणास भिडावी अशी उंचावली सरते शेवटी शिवराज्य प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष पूर्वांग तांदळेकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल थोडक्यात माहिती व इतिहास सांगितलं व सर्वांचे ऋण व्यक्त करून शिवघोषणा दिल्या व आभार मानण्यात आले व सर्व सभासदांच्या,प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

 

No comments