web-ads-yml-728x90

Breaking News

चित्रनगरीतील अनधिकृतपणे ताब्यात असलेली उपाहारगृहाची जागा निष्कासित करण्याचे आदेश शहर दिवाणी न्यायालयाकडून कायम

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी ही चित्रिकरणासाठी एक आदर्श जागा म्हणून चित्रनगरीकडे पाहिले जात आहे. चित्रिकरणात सहभागी होणाऱ्या सर्व घटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा चित्रनगरीतच उपलब्ध करुन देण्याचा महामंडळाचा सुरुवातीपासूनच कल आहे. या पार्श्वभूमीवर कलाकार/सहकलाकार, सेट उभारणीसाठी येणारे तंत्रज्ञ,मजूर यांना अल्पोपहाराची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महामंडळाच्या परिसरात कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येते. लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाने सन 1995 मध्ये 1012 चौ.फुट जागा रु.1518 या नाममात्र दराने 5 वर्षासाठी दिली होती. तद्नंतर पूर्वी दिलेल्या जागेत वाढ करुन सन 2001 मध्ये एकूण 1932चौ.फुट एवढी जागा 10 वर्षासाठी करारनाम्याद्वारे भाडेतत्वावर देण्यात आली होती. सदर करारनामा हा द्विपक्षीय सहमतीवर आधारित असून करारनाम्यास मुदतवाढ द्यावयाची झाल्यास ती दोन्हीं पक्षांच्या सहमतीवर अवलंबून राहील अशी स्पष्ट तरतूद करारनाम्यात होती. तथापि, करारातील तरतुदीचे पालन न करता श्री. गायकवाड यांनी जागा सोडण्यास करण्यास नकार दिला.गायकवाड यांच्याकडे असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी महामंडळाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या दि. 03.04.2013 रोजी दिलेल्या आदेशान्वये प्रफुल फास्ट फुड यांना जागेमधून निष्कासित करण्याचे आदेश दिले. सदर आदेशाविरुद्ध श्री.गायकवाड यांनी सन 2013 मध्ये मा.शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मा. दिवाणी न्यायालयाने श्री. गायकवाड यांचा दावा फेटाळून लावत 2 महिन्याच्या आत जागा महामंडळाकडे परत करण्याचा निर्णय दि.15.06.2015 रोजी दिला. या आदेशाविरुद्धही श्री.गायकवाड यांनी मा. उच्च न्यायालयात अपील केले असता मा. उच्च न्यायालयाने दि. 13.08.2015 रोजी श्री गायकवाड यांचे अपिल फेटाळून लावले आहे.

No comments