0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अभिनेता विवेक ओबेरॉय याला दंड ठोठावण्यात आला आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने विवेकवर कारवाई करण्यात आली. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आले आहे. तर मुंबईतील जुहू पोलीसात विवेक ऑबेरायवर गुन्हा नोंदवल्याचीही माहिती आहे. मध्यंतरी विवेक ओबेरॉयने बाईक राईडचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याखाली त्याने कॅप्शनही दिलं होतं. ‘व्हॅलेंटाइन डेची मस्त सुरुवात… मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड’ अशा आशयाचं कॅप्शन विवेकने दिलं होतं. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले.वर्गीस यांच्या या ट्वीटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेकला 500 रुपयांचं चलानही मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे.

Post a Comment

 
Top