web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात गोंदियासाठी १६५ कोटींचा निधी मंजूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  गोंदिया

कोविड महामारीमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला असून, तब्बल 75 हजार कोटी रुपयांची तूट आहे. जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात गोंदिया जिल्ह्याने 165 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीतील निधी मंजूर करण्यात आला. मात्र मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज गोंदिया‍ जिल्ह्याची राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा बैठक अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल,  वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी दिपककुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी नाखले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे, श्रीमती शलाका सूर्यवंशी, श्रीमती पूजा पाटील यावेळी उपस्थित होते.

No comments