web-ads-yml-728x90

Breaking News

मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा महाराष्ट्राने संकल्प करावा – राज्यपाल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. मात्र त्यासाठी सर्व महाराष्ट्राने मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘वाग्धारा सन्मान’ देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच वाग्धाराचे अध्यक्ष वागीश सारस्वत उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांना लोक ज्याप्रमाणे ‘माऊली’ म्हणून संबोधतात त्याप्रमाणे मराठी ही राज्यातील सर्वांची ‘माऊली’ आहे. या माऊलीचे वैभव वाढावे असे सर्वांना वाटते. परंतु, बहुतेक जण आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठविणे पसंत करतात, असे त्यांनी सांगितले.

No comments