0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

संकट प्रसंगी इतर देशात लोक सरकारवर विसंबून राहतात. भारतात मात्र जनसामान्य लोक आपापसातील मतभेद विसरून निःस्वार्थ सेवेसाठी तत्पर होतात. त्यामुळेच कोरोनासारखे संकट येऊन जगभर हाहाकार झाला तरीही भारताने त्यावर सफलतेने मात केली. भविष्यातही  कोरोनासारखी संकटे येतील आणि जातील. मात्र जोवर देशात त्याग, समर्पण व सेवेची भावना आहे, तोवर भारतीय समाज जीवंत राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ठाणे येथील संस्कार सेवाभावी संस्थेद्वारे राजभवन येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सेवाभावी संस्था, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांसह विविध क्षेत्रातील 30 करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्कार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर तसेच महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे उपस्थित होते.

Post a Comment

 
Top