web-ads-yml-728x90

Breaking News

आठवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल होणार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद

औरंगाबादकर सिनेरसिकांसाठी एन आनंदाची बातमी आहे. आठवा औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (AIFF)ची घोषणा करण्यात आली आहे. ९ ते १३ एप्रिल २०२१ या काळात आठवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल होणार आहे. हा महोत्सव औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमधील आयनॉक्समध्ये होणार आहे.दरम्यान फेस्टीव्हलच्या निमित्ताने नाथ ग्रुप, एमजीएम प्रस्तुत आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतिने मराठवाड्यातील युवा सिनेविद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आठव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त युवा सिनेविद्यार्थ्यांसाठी शॉर्टफिल्म स्पर्धा ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे.

No comments