web-ads-yml-728x90

Breaking News

२१ फेब्रुवारी सदाशिव टेटविलकर लिखित “गावगाडा प्राचीन ते अर्वाचीन” पुस्तक प्रकाशन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर लिखित गड, किल्ले ,लेणी , मंदिर ,मूर्ती ,वीरगळे अशा नानाविध  वाचकप्रिय पुस्तकांनंतर आपली संस्कृती इतिहास आणि काळानुरूप बदलणाऱ्या परंपराचा वेध घेणारे सदाशिव टेटविलकर लिखित गाव गाडा प्राचीन ते अर्वाचीन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड ठाणे येथे सायंकाळी ५ते ७ या वेळेत सोशल डिस्टन च्या नियमात संपन्न होत आहे. यावेळी पुस्तकाचे प्रकाशन मा नरेश म्हस्के महापौर ठाणे यांच्या शुभहस्ते होणार असून समारंभाचे अध्यक्ष मा डॉ राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी ठाणे व मा डॉ बी. डी. कुलकर्णी उपाध्यक्ष भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे व अधिष्ठाता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

No comments