web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड उपअभियंता सत्यजित कांबळे शाखा अभियंता आल्टे व मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ शाखा अभियंता ओसरमाल यांना बर्डतर्फ करण्याची मागणी लोकआयुक्तांकडे तक्रार

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

 ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम उपविभाग मार्फत सन 2018 ते 2019 फेब्रुवारी दरम्यान ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियता ठाणे टेंडर क्लार्क निकम मुरबाडचे सा.बा.उपअभियंता सत्यजित कांबळे शाखा अभियंता आल्टे यांनी मुरबाड शहर पळू सोनावळे पर्यटनस्थळ सिध्दगड मुरबाड रेस्ट हाऊस मुरबाड ग्रामीण रूग्णालय तसेच मुरबाड तालुक्यात सन 2018 ते 5 फेब्रुवारी 2021 दरम्यान सुबो मंजुर सोसायटया इटेंडरवर दाखवून बोगस कामाची बिले एमबी बनवुन कामे न करता शासनाचा निधी हाडप केला आहे.अशा कामाची चौकशी एटीएस मार्फत करून संबधित ठेकेदारावर गुन्हें दाखल करून कार्यकारी अभियंता मुरबाडचे उपअभियंता शाखा अभियंता यांना नोकरीतुन बर्डतर्फ करावे तसेच मुरबाड नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ शाखा अभियंता ओसरमाल आकाऊन्टंट यांनी साजर्इ फाटा ते समर्थ हॉल पर्यंतचा रस्ता न करता 10 लाखाचा बिल काढला असुन शहरातील एकाच रस्त्यावर दोन ते तीन वेळा टेंडर दाखवुन शासनाच्या निधीचा अपहार केलेला आहे. तसेच मुरबाड तालुक्यात झालेल्या काँक्रेट रस्त्यावर पुन्हा टेंडर काढुन कोटी रूपयाचे बिले एकाच रस्त्यावर काढले आहे.यावर कारवार्इ करण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे सिध्द होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुरबाड नगरपंचायत यांचे टेंडर मॅनेजमेन्ट करून ऑनलार्इन टेंडर ओपन न करता काही टेंडर रद्द दाखवुन टक्केवारी घेवुन समर्थक ठेकेदाराला 1 टक्के घेवुन टेंडर देण्यात आले आहेत अशा टेंडर क्लार्कवर निलंबनाची कारवार्इ करावी व मडकेपाडा नॅश्‍नल हायवे लगतचा सिमेंट काँके्रट प्लाँन्ट अनाधिकृत की अधिकृत यांची चौकशी करावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी लोकाआयुक्त यांच्याकडे केली आहे.

No comments