web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणेच्या सिद्धेश पांडेला अजिंक्यपद

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने डॉ. रमेश प्रभू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तब्बल २३ वर्षांनी मुंबईत ८२ व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धांचे आयोजन विलेपार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात करण्यात आले. १९ जानेवारी पासून महिला व पुरुष अशा कॅडेड सबज्युनिअर, ज्युनिअर, युवा व युथ असे विविध गटातील टेबल टेनिस चे सामने घेण्यात आले. सुरुवातीचे ५ दिवस महिला गटातील सामने रंगले.  त्यानंतर पुरुष गटातील २४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत स्पर्धा झाली.  गुरुवारी २८ जानेवारीला झालेल्या २१ वर्षावरील पुरुष गटातील टेबल टेनिस स्पर्धेतील एकेरी सामन्यात ठाण्याच्या सिद्धेश पांडे  याने टी एस टी टी ए च्या चिन्मय सोमय्या याचा धुव्वा उडवत विजयाची माळ जिंकली. सिद्धेशने आक्रमक खेळी करत ४-२ ने चिन्मयचे आव्हान संपुष्टात आणले. अंतिम फेरीत ठाण्याच्या सिद्धेश ने १२-१०, ११-५, ९-११, ९-११, ११-७, ११-६ असा गेम करत चिन्मयला पराभूत केले. लॉकडाऊन च्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर रंगलेल्या सामन्यांमध्ये क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह दिसून आला.  गेल्या दहा दिवसांपासून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल टेबल आणि चेंडूंच्याआवाजाने प्रसन्न झाले. ठाण्याच्या दीपित पाटीलने ज्युनिअर आणि युथ गटात झालेल्या एकेरी सामन्यात अजिंक्य पद पटकावून दुहेरी मुकुट मिळवला दीपित ने ज्युनिअर गटात आदिल आनंद ला ४-२ ने तर युथ  सामन्यात तन्मय राणेला ४-२ अशी धुल चारली. परुंतु युवा पुरुष एकेरी गटातील सामन्यात ठाण्याच्या सिद्धेश पांडेने दीपितला उपांत्यपूर्व फेरीतच थांबवून ठेवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत टी एस टी टी ए च्या चिन्मय सोमय्या ने शिवम दास ला ४-२ ने मागे टाकून अंतिम फेरी गाठली

    गुरुवारी पार पडलेल्या सांगता समारंभाला प्रमुख अथाति म्हणून नॅशनल बॅडमिंटन खेळाडू आणि महाराष्ट्र राज्याचे बॅडमिंटन कोच राहिलेल्या कौशलकुमार चिमा यांच्या हस्ते सिद्धेश पांडे सह अन्य खेळाडूंना गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशिअन च्या उपाध्यक्षा स्मिता बोडस व प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments