0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी चेंबूर व मानखुर्द येथील विविध ठिकाणांच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्याच्या सुरुवातीस पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी मानखुर्द फ्लायओव्हरच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. हा ब्रीज एकूण २.९ किमी लांबीचा आहे. त्यातील २.५ किमी लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित ४०० मीटरचे कामदेखील पूर्ण होत आले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल जनतेसाठी खुला होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द दरम्यान देवनार डंपिंग जंक्शन असल्याने तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मुंबईबाहेर जाण्यासाठी किंवा नवी मुंबईकडे जाण्यासाठी हा महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने येथे रहदारी असते. या परिस्थितीतही मुंबई महानगरपालिकेने उड्डाणपुलाचे काम वेगात करून पूर्णत्वापर्यंत आणले आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणीवेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, मुख्य अभियंते राजन तळकर, उपायुक्त अनंत कदम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

 

Post a Comment

 
Top