0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक घेण्याचे येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.मंत्रालय येथे औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत  बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर एकत्रितपणे मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले. औषध निर्माण अधिकारी हे पद एकाकी पद असल्याने यात काही धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी स्पष्ट केले.

 

Post a Comment

 
Top