web-ads-yml-728x90

Breaking News

नवे माहिती तंत्रज्ञान धोरण अधिक गतिशील असेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उद्योग विभागाच्यावतीने नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून ते पूर्वीच्या धोरणापेक्षा अधिक गतिशील असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.उद्योग विभागाच्यावतीने माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी आयटी क्षेत्रातील जाणकारांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेला अधिक वाव आहे. नव्या आयटी धोरणात याचा समावेश करावा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भागांत मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग विस्तारला आहे. येत्या काळात राज्याच्या ग्रामीण भागांत या क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस असून नव्या बदलांसह रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धनांवर अधिक भर दिला जाईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

No comments