web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यावरणाचे रक्षण करत मुंबईचा सुनियोजित विकास करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करत करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन,शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन,बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, कौशल्य विकास मंत्री श्री नबाव मलिक, पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,आमदार झिशान सिद्दीकी, आमदार डॉ.मनिषा कायंदे, आमदार सदा सरवणकर,खासदार राहुल शेवाळे व एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त के.एच गोविंदराज तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा यापुढे सुनियोजित विकास करण्यावर भर देण्यात येईल. एमएमआरडीएची पायाभूत सुविधांची कामे आव्हानात्मक आहेत. तसेच ती कौतुकास्पदही आहेत. मुंबईत वाहतूक समस्या दिवसें दिवस वाढत आहे. यावर स्मार्ट पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यासाठी पार्किंगची व्यवस्था देखील आधुनिक पद्धतीने करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देतानाच ती सर्वांना परवडणारी कशी होईल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  मुंबईसारख्या शहरात आजही सायकल चालवली जाते, यासाठी स्वतंत्र ट्रॅक असणे गरजेचे आहे. ही सर्व विकासकामे करत असतानाच पर्यावरण रक्षण करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे श्री ठाकरे यांनी सांगितले.

       

No comments