0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पणजी

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याने, राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं होत. राज्यपाल पदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले होते. यावरून भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलेली.शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपवर टीका करत, राज्यपालांना खोचक टोला लगावला होता. ‘भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचे विमान वापरावे, थोडा फार त्यांच्यावरही टाकावा’, असे राऊत म्हणाले होते.दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘गोवा सरकारकडे विमान नाही, हे संजय राऊत यांना माहीत आहे. मात्र, गोव्याकडे विमान असते, तर ते राज्यपालांचेच असले असते. महाराष्ट्रात घडलेल्या प्रकारावर न बोललेलं बरं’, असे म्हणत सावंत यांनी राउत यांना टोला लगावला आहे.

Post a Comment

 
Top