web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड कुणबी समाज हॉल पासून साजई समर्थ हॉल पर्यंतचा रस्ता गेला चोरीला नगरपंचायतीच्या सीओने काढला माजी नगराध्यक्षाचा खोटा बिल काय होईल कारवाई

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायत मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्या पासुन काही कोटीचा घोटाळा झाला शासनाच्या जमिनी हाडप करून व्यापारी गाले विकले रस्ते इमारती शौचालय गटारी वृक्षलागवड घनकचरा डंपीग ग्राऊन्ड पर्यटनस्थळ तलाव सुशोभिकरण विद्युत सेवा अशा अनेक कामात कोटीचा भ्रष्टाचार करून अग्नीशमक दल गाडया खरेदी पासून अतिक्रमणे इमारतीना कर लावण्यापर्यत काही कोटीचा घोटाळा केला मात्र त्यांच्या भ्रष्टाचारावर काहीही कारवाई झाली नाही याचे कौतुक कोणाचे करायाचे असा सवाल उपस्थित होत आहे.सत्ता ज्याची त्याचीच मालकी अशी दहशत अधिकार्‍याना हाताशी धरून भाजपानी तयार केली त्यांना शह देण्यासाठी कोणीही पुढे आला नाही त्याचा फायदा आजच्या बोगस कामे करून ठेकेदारी दादागिरी करणायानी घेतला असुन कुणबी समाज हॉल पासुन साजई येथील समर्थ कृपा हॉल पर्यत काँक्रेट रस्त्याचा टेंडर झाला मात्र त्याचा काम न करता लाखो रूपये काढणार्‍या मुख्यकार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ शाखा अभियंता ओसरमाल यांच्यावर निलंबनाची कारवाई शासनाने करावी अशी मांगणी मुख्यमंञ्याकडे केली आहे.याच साजई रस्त्यावर जिल्हापरिषदेचा टेंडर मंजुर असुन त्याचाही विस लाख रूपये निधी मंजुर झाला आहे.एकाच रस्ता दोघानी करून शासनाचा निधी लाटण्याचा धंदा कोण करतंय सत्ताधारी विरोधक ठेकेदारीसाठी एकत्र येतात त्यामुळे शासनाच्या निधीत भ्रष्टाचार होत आहे (भाग - 1)

No comments