web-ads-yml-728x90

Breaking News

माळशेज घाटात रात्रीचा खेळ चाले भिंती आड भिती

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

गेले काही वर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला पर्यटक वाहानचालक यांच्या मृत्युचा सापळा बनलेल्या माळशेजघाटावर आजपर्यंत प्रत्येक सत्ताधारी कर्तबगारी अधिकारी ठेकेदार मंत्री यांनी घाटाच्या दुरूस्तीवर लाचारी टक्केवारी भ्रष्टाचाराने पैसा कमावुन आपल्या कुटूंबाची हौसमौज केली त्याचं माळशेजघाटाची सवय दुर्लक्ष करत आहे.रात्रीच्यावेळी निकृष्ट क्राँकेटकरण रस्ता बनवणे सुरू असल्याची स्थिती 10 फेब्रुवारी रात्री 8 वाजता आमच्या कॅमेर्‍यात कैद झाली आहे.राजकारण ठेकेदारी लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी माळशेज घाटाच्या पर्यटन पॉईंट रस्ते संरक्षणभिंती यावर कोटी रूपये कमविले आजही माळशेजघाट कर्माचा बनून राहिला आहे.माळशेजघाटात अत्यंत निकृष्ट दर्जाचे रात्री काम केले जात आहे.कोणी ही नॅशनल हायवेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते एकरी रस्ता असल्याने रात्रीच्यावेळी मोठया प्रमाणात आपघात होण्याची भिती आहे.माळशेज घाटात खडडयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.अंधाराचे साम्राज्य आहे.असुरक्षेचा घाट म्हणुन राज्य सरकार मुग गिळून गप्प आहे.

मुरबाड  तालुका भ्रष्टाचाराचा अडडा टक्केवारीचा धंदा

मुरबाड तालुक्यात लोकाना पुढे करून आजपर्यंत रस्ते इमारती अन्य कामे करून ठेकेदारीच्या टक्केवारीवर सत्ताधारी पुढारी ठेकेदार अधिकारी बंगलो गाडया आमाप संपत्ती राजकारणी बनले मात्र सामान्य जनतेला त्यांच्या तक्रारी समस्याना न्याय मिळाला नाही शासनाच्या योजनाचा लाभ मिळाला नाही फोटो बॅनरने देशासमोर कागावा करून कुटूंबाची हौसमौज करून खोटया समाजसेवेचा आव आणुन स्वताला लोकाचा नेता प्रतिनिधी स्वताच बनवणार्‍यानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टेंडर क्लार्क बिले काढणारे सर्व अधिकारी उपअभियंता मुरबाड शाखा अभियंता यांना हाताशी धरून प्रथम थातुरमातुर काम करून नंतर टेंडर काढून मॅनेज करून हरामखोरीने लाचारीने शासनाचा पैसा कमविण्याचा धंदा सुरूच ठेवला असुन सरकार सत्ता कोणाचीही असो भ्रष्टाचारी टक्केवारी हरामखोर एकत्रच येवुन मोट बांधताना दिसत आहेत त्यांना मंत्री अधिकारी लोकप्रतिनिधी यांचा पाठबळ मिळत आहे हेच जनतेचे दुदैव आहे.मुरबाड नगरपंचायत मध्येही ज्याची सत्ता त्याची हाम-करोशी कायदा स्वताचा काहीही व्यवसाय नसताना शासनाच्या रस्ते गटारी संडासाचा निधी भ्रष्टाचारानी लाटणार्‍याना पक्षाच्या जडणघडणीसाठी  अधिकार्‍याना कटपुतळे बनवुन पाठबळ देणार्‍या नेत्यानी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा घेतलेला निर्णय लोकाभिमुख सेवा म्हणायाची काय ?असा सवाल अनेकानी केला आहे.मुरबाड शहरातील गटारी अपुर्ण आहेत.मातानगर रस्ता मधुन दोन वाहाने समोरा समोरून जात नाहीत.एकाच रस्त्यावर दोन वेळा निधी खर्च फक्त आपल्या कार्यकर्त्याना पोसणावळ म्हणुन शासनाचा निधी हाडप करण्याचा धंदा म्हणजे मुरबाड नगरपंचायतीची जनसेवा स्वताला म्हणणार्‍यानी एकदा आत्मचिंतन करावं गांवात साधं सौचालय नाही शासनाचा भुखंड हाडप करून व्यापारी गाले अवैधरित्या बांधुन 5 ते 15 लाखात विक्री करून हरामाची दौलत कमविणारेही म्हणतात आम्ही लोकसेवक अशा लोकसेवकाचे नेतेगिरी करणारे किती लाचार असतील त्यांना सरकार पाठिशी घालतो दोस्ती टिकवून ठेवतो सत्ताधारी अधिकार्‍याना आपल्या टक्केवारी तुकडयावर कसेही वागवून घेतात आणि लाचार भ्रष्टाचारी सीओ शाखा अभियंता आपल्या चांगल्या शिक्षणाचा बटयाबोळ करतात यापेक्षा जनतेच्या वाटयाला आलेले दुदैव कसले असा सवाल नागरिक करत आहेत.

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती जेवणाचा अडडा

सरकारी जागा शेतकर्‍याच्या नावे हाडप करून एकही भाजीपाला कांदे बटाटा फळे फुलाचे दुकान बाजारपेठ नसणार्‍या मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संचालकानी शासनाची जागा हाडप करून 300 व्यापारी गाले पाडुन त्याची विक्री करून हरामखोरीची कमार्इ केली सत्ताधारी विरोधकानी आपआपसात गाले वाटप करून घेतले अवैध बिल्डींग बांधली नगरपंचायतीने अवैध बांधकाम कर आकारणी करून विद्युत लार्इट दिली त्या भ्रष्टाचाराची चौकशी अवैध बांधकाम महसुल जागा हाडप केल्याची चौकशी भाजपा सरकारने केली नाही आणि आज महाविकास अघाडी सरकार करत नाहीत हा राजकारण्याचा पैसे कमविण्याचा धंदा आहे तसेच जेवणावळीचा अडडा आहे.

No comments