BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
कोरोनासारखी संकटे पुढेही येत राहतील, मात्र अशा कठीण काळात एकमेकांना सहकार्य केल्यास समाज आणि देश टिकून राहील, असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. राजभवन येथे झालेल्या वोकहार्ड फाउंडेशनच्या नामवंत कॉर्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार अवॉर्ड प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर वोकहार्ड फाउंडेशनचे विश्वस्त, सीईओ हुजैफा खोराकीवाला, भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे उपस्थित होते.
Post a comment