0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तब्बल 100 रुपये प्रति लिटरने पेट्रोलची विक्री सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकार दर कमी करायचे सोडून नवीन पर्याय सांगत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पर्यायी इंधनांचे समर्थन करताना मंगळवारी म्हटले की, देशाने पर्यायी इंधनावर भर देण्याची हीच ती वेळ आहे. गडकरी पुढे म्हणाले की, आधीपासूनच देशात 81 टक्के लिथियम-आयन बॅटरीज तयार केल्या जात आहेत. यासह सरकार हायड्रोजन इंधन सेल विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा विश्वास आहे की, नवीन इंधन पर्यायासाठी आताच योग्य वेळ आहे. लिथियम आयन बॅटरीवर सध्या चीनसारख्या देशांचे वर्चस्व आहे, परंतु भारत सरकारही इंधनाच्या पर्यायांवर वेगाने काम करून या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करू इच्छित आहे.

Post a Comment

 
Top