web-ads-yml-728x90

Breaking News

वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय म्हसा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

दि 19 रोजी येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,म्हसा (ता.मुरबाड) येथे हिन्दवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.प्राचार्य डॉ. सी. एम .मोहिते यांच्या हस्ते 'शिवप्रतिमा पूजन'होऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी गाणी,पोवाडे,भजन,भाषण इ सादर केले.

महाराज, आज तुम्ही राहिले असते तर  हि कविता  बी डी लोहार यांनी सादर केली. या नंतर प्रा.डॉ. सी.एम. मोहिते सर यांनी "छत्रपती शिवजी महाराज आणि त्यांच्या राज्य कारभर "या विषयी इतिहास सांगितला. दिपक केदार सर यांनी सूत्रसंचालन केले,तर जगन्नाथ कथोरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.ज्येष्ठ शिक्षक यशवंराव सर,प्रा सौ निपुरते मॅडम , सौ पाटील मॅडम ,प्रा सौ घोलप मॅडम,सौ.चौधरी मॅडम, सौ गोडांबे मॅडम,प्रा स्वाती पवार आदि शिक्षकवृन्द उपस्थित होता. शिरीष पष्टे, मल्हारी घरत, सुनिल मुकणे यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

No comments