BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे
पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते.
याच पार्श्वभूमीवर, पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत आम्ही तपास करणार आहोत असा दावा आता पुणे पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात कायदेशीर अडचणी असल्यानेच गुन्हा नोंद केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेले काही दिवस पूजाच्या प्रकरणात पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होत होती. या प्रकरणात एका मंत्र्याचा हात असल्यामुळेच तपास केला जात नसल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्या पार्श्वभूमीवर तपास सुरु असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
Post a comment