web-ads-yml-728x90

Breaking News

कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वजाचा अनावरण व लोकार्पण सोहळा...!

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

समाजाची एकजूट, ताकद व एकीचे बळ साऱ्या विश्वाला दिसावे यासाठी आपल्या सर्वाना एका झेंड्याखाली एकत्र येणे काळाची गरज होती.म्हणून कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज निर्मितीचा कार्यक्रम हाती घेऊन भारताच्या कानाकोपऱ्यात गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा व मुंबई सह महाराष्ट्राच्या खेडोपाडी, तालुका, जिल्हा पातळीवर ध्वज निर्मितीचे महत्व कुंचिकोरवे समाजापुढे ठेवून एक चळवळ उभी केली. या चळवळीला आपल्या समाजबांधवांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला. आणि त्याचे फलित म्हणून पाठक हायस्कुल, सिनियर व ज्युनियर कॉलेज, वाकोला ब्रिज, सांताक्रुझ (पूर्व) मुंबई ४०० ०५५ येथे दिनांक २१ फेब्रुवारी,२०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत "कुंचिकोरवे दिनाच्या " दिवशी कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वजाचे अनावरण करून लोकार्पण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर कुंचिकोरवे समाजाची लोकसंख्या जाहीर करून समाजासाठी डाक्युमेंटरी (माहितीपट) व ऑडिओ म्युझिकचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्याचे योजिले आहे. असे अखिल भारतीय कुंचिकोरवे समाज विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

No comments