web-ads-yml-728x90

Breaking News

मारवाडी समाजाच्या दातृत्वाचे राज्यपालांकडून कौतुक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भिवंडी येथील श्री गोपाल गौशाळेच्या माध्यमातून काेरोना काळात गोरक्षण व गोवंश सेवेच्या उल्लेखनीय कार्यासाठी संस्थेचे विश्वस्त उमाशंकर रुंगटा व मोहनलाल अगरवाल यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २७ फेब्रु) करोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्या वतीने राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते निवडक करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यपालांनी मारवाडी समाजाच्या दातृत्वगुणाचे कौतुक केले. मारवाडी लोक सिक्कीम, उत्तराखंड तसेच नेपाळसह देशातील सर्व प्रदेशात आहेत. स्थानिक लोकांशी ते स्नेहभावाने वागत असल्यामुळे त्यांना कोठेही विरोध होत नाही. मारवाडी समाज दानशूर असून समाजातील लोकांनी गावागावात धर्मशाळा, शिक्षण संस्था, उभारून समाजाचे ऋण फेडले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

No comments