web-ads-yml-728x90

Breaking News

सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेरिटाइम स्टडीजचे उद्घाटन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भारताला मोठा सामुद्रिक वारसा लाभला आहे. देशाला ७५०० किमी लांबीचा तर महाराष्ट्राला ७२० किमी समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्र केवळ देशाच्या सुरक्षेच्या  दृष्टीने महत्त्वाचा नाही; तर तो व्यापार, वाणिज्य, मत्स्य उत्पादन, तेल व भूगर्भ वायूनिर्मिती या दृष्टीने सर्वांकरिता महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने समुद्राच्या विविध पैलूंचा शास्त्रीय पद्धतीने सर्वंकष अभ्यास करावा तसेच समुद्र विज्ञानातील देशाच्या समृद्ध वारशाचेदेखील पुनरुज्जीवन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

मुंबई विद्यापीठाने नव्याने स्थापन केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेरीटाईम स्टडीज’चे उद्घाटन राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले.

No comments