0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  रायगड

सध्या राज्य, देश, संपूर्ण जग कोरोनासारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे त्याचबरोबर पाण्याची टंचाईदेखील मोठी समस्या आहे. पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील नाव्हा-शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजना भूमिपूजन सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,  सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, पंचायत समिती पनवेल सभापती देवकी कातकरी, ग्रामपंचायत खानावळे सरपंच जयश्री नाईक, ग्रामपंचायत बारवाई सरपंच नियती बाबरे, जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

 
Top