web-ads-yml-728x90

Breaking News

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी शेळी कृत्रिम रेतन प्रकल्पाविषयी घेतली माहिती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांची राज्यातील शेळी पालन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आणि बंदिस्त शेळीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या शेळी संशोधन आणि दुवास शेळीपालन पशुवैद्यकीय विद्यापीठ मथुरा येथे भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी  शेळी कृत्रिम रेतन प्रकल्पाविषयी माहिती घेतली. त्यांनी पशुवैद्यकीय मथुरा विद्यापीठ पाहून कुलगुरूसह विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक केले. आणि कुलगुरू प्रो. जी के सिंह, डीन  प्रो.पी के शुक्ला, डॉ. सरवजीत यादव यांचे आभार मानले.

No comments