0

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आघाडी सरकार कटिबद्ध आहे असे अनेकदा सांगितले आहे. मात्र सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या सरकारने धनगर आरक्षणासाठी केंद्राला दोन ओळीची शिफारसही केलेली नाही ही धनगर समाजाची फसवणूक आहे. आघाडी सरकारने तातडीने केंद्राला धनगर आरक्षणासाठी शिफारस न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकात हाके यांनी म्हटले आहे की, धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या शिफारशीची आवश्यकता असून शिफारशीनंतरच केंद्रातील आदिवासी विभाग व आदिवासी आयोग धनगर आरक्षणाचा प्रस्ताव संसदे समोर मंजुरीसाठी ठेवेल. जो पर्यंत राज्य सरकारची शिफारस असणार नाही तोपर्यंत केंद्र काहीही करू शकणार नाही. असे केंद्रीय विकास राज्यमंत्री रेणुका सिंह-सरुता यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

Post a Comment

 
Top