web-ads-yml-728x90

Breaking News

देशाला संपवण्याच काम मोदींनी मनात आणू नये - नाना पटोले

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गेले अनेक दिवस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण होणार ? यावरून तर्क लावले जात होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचीच निवड निश्चित झाली होती. यानंतर, हायकमांडने देखील त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आज नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांच्या भाषणात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाना साधला आहे. हा पदग्रहण सोहळा नाही तर शेतकऱ्यांचे अधिवेशन आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.आता चार्ज माझ्यकडे आहे त्यामुळे मोदिजी शेतकऱ्यांच्या वाटेला जाऊ नका. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. भविष्यात शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व मोठ्या हिम्मतिने उभे राहू, भाजपवाले ढोंगी आहेत जेव्हा राकेश टिकेत शेतकऱ्यांसाठी रडतात त्यावर टीका करतात, अन हे नटसम्राट राज्यसभेत रडतात त्याच काय ?” असा सवाल देखील नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

 

No comments