web-ads-yml-728x90

Breaking News

सिंधुदुर्गच्या विकासासाठी १७० कोटी; रत्नागिरीसाठी २५० कोटी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधरण) सन 2021-22 ची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी 170 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण तंत्र मंत्री तथा सिंधुदुर्ग पालक मंत्री उदय सामंत यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धी व स्थानिकांना रोजगार या दृष्टीकोनातून शाश्वत पर्यटन विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत 170 कोटीच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधु-रत्न समृद्धी विकास योजना जाहीर केली होती. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच विमानतळाकडे जाणारे रस्ते, सिंधुदुर्ग नवनगर विकास प्राधिकरणासाठी निधी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती भवन यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भरपाईचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.

No comments