web-ads-yml-728x90

Breaking News

श्रीवर्धन किनाऱ्याचे सौंदर्य अधिक वाढविणार – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीवर्धन किनाऱ्यावर अधिक पायाभूत सुविधा व सौंदर्यवृद्धीतून पर्यटन विकास साधण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.श्रीवर्धन तालुका व किनारा हा स्वच्छतेत अग्रेसर आहेच. तेथील स्वच्छता व सुविधांमध्ये वाढ करुन पर्यटन विकास साधता येईल. सुशोभीकरणाच्या बाबींवर विशेष भर देण्याबाबतच्या सूचनाही तटकरे यांनी दिल्या.किनाऱ्यावर 50 कलाकारांसाठी क्षमता असलेले कायमस्वरुपी स्टेज, पर्यटकांसाठी स्वच्छ व मुबलक जागा असलेले चेजींग रुम, खानपान व्यवस्था तसचे सॅण्ड आर्ट नमुने व त्याचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी व्यवस्था असावी, असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिले.किनाऱ्यावर गार्डन, विद्युत रोशणाई, बैठक व्यवस्था, व्यायामशाळा, निगराणीसाठी सुरक्षा इमारत, सीसीटीव्ही यंत्रणा आदींच्या माध्यमातून येथे सुविधा उपलब्ध करण्याबाबत सादरीकरणात माहिती देण्यात आली.

No comments