BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
गावठाण जमिनीवरील अतिक्रमणे हाटवण्यासाठी ग्रामसेवक चालढकलपणा करतात मोजणी पुर्ण करत नाहीत अतिक्रमण धारकाना पाठीशी घालुन शासनाच्या जमिनी अतिक्रमण धारकाच्या घशात घालतात अशा मांगण्यासाठी श्रमजिवी संघटनेचे ठाणे जिल्हा कातकरी घटक प्रमुख पंकज वाघ तालुका सचिव महेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकानी मुरबाड पंचायत समितीच्या प्रवेश पायर्यावर बसुन आंदोलन केले.या आंदोलनाची दखल घेण्यासाठी श्रमजिवीचे कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापती गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती केली परिणामी आंदोलकानी लेखी आश्वसनाची मांगणी लावुन धरल्याने अखेर गटविकास अधिकारी मुरबाड यांनी श्रमजिवीच्या शिष्टमंडळाला कारवाई करण्याचे लेखी आश्वसन दिले तसेच म्हसा येथील गांवठाण अतिक्रमण मोजणी आठवडयात करून कारवाईचे आश्वसन दिले त्यावेळी आंदोलन तात्पुरते स्थगित झाले आहे.मुरबाड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड वनविभाग श्रेत्र म्हसा व अन्य परिसर नगरपंचायत मुरबाड दुमजली व्यापारी गाले सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरबाड तसेच मुरबाड नगरपंचायत यांनी केलेली बोगस रस्ते इमारती अवैध बांधकामे अन्य समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी यापुढे वरिष्ठ नेत्यांचा मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा आंदोलन छेडले जाणार आहे अशी माहिती पंकज वाघ यांनी दिली.
म्हसा येथील १२ एकराच्या गावठाणात म्हसा गावातील लोकांनी प्रचंड प्रमाणात बळकावले आहे तसेच तेथे कुंपण करून शेती करत आहेत परंतु त्याच गावठाणात राहणारी कातकरी वस्ती मात्र सर्व सोयी सुविधांपासून वंचित राहिली आहे, स्वातंत्र्याला ७३ वर्षे होऊन सुद्धा म्हसा कातकरी वाडीतील कातकरी अजून नागरी सुविधांपासून वंचितच राहिला आहे,तसेच वेळोवेळी गावठाण असून सुद्धा गावकर्यांकडून होणारी दमदाटी ऐकून ते हैराण झाले होते म्हणूनच 6 महिन्या पूर्वी श्रमजीवी संघटने च्या पुढाकाराने तेथील गावठाणाची मोजणी ग्रामपंचायत ने टाकली पण अजून ती देखील आली नव्हती तेवढ्यात दिनांक 28/1/2021 ला सरकार तर्फे म्हसा ग्रामपंचायत मधील सर्व गावठाणची मोजणी करायचे पत्रक म्हसा ग्रामपंचायत ला आले पण ग्रामसेवकाच्या हुशारी मुळे व तेथील राजकारणामुळे कातकरी वाडी ची मोजणी वगळून बाकी मोजणी करण्यात आली व कातकरी वाडी चे गावठाण मोजणी तशीच प्रलंबित त्यात ग्रामसेवक यांच्या सोबत संपर्क केला असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणून आज दि. १/०२/२०२१ रोजी श्रमजीवी संघटनेने जोपर्यंत गावठाणाची मोजणी चा विषय मिटत नाही तो पर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.आंदोलना मध्ये ठा. जि. कातकरी सचिव पंकज वाघ , तालुका सचिव महेश वाघ , शेतकरी प्रमुख सुरज राजपूत , युवक सचिव दिलीप शिद , कुंदा पुंजारा हे उपस्थित होते
Post a comment