0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - बारामती

शहरी तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आजार वाढत असून कोरोनासारख्या आजाराचे आव्हान आपल्यासमोर आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. आरोग्य विषयक सुविधामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, माळेगाव बु. व प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे येथील नवीन इमारतीचे उद्धाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री दतात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य रोहिणी तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top