web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात १,९१,४९५ स्नातकांना पदव्या

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला चालना देण्याची गरज असून कालपरत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांना अनुसरून शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, नॅनो  तंत्रज्ञान मागे पडून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र पुढे आले आहे. जगासह देशात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने अनेक समाजोपयोगी संशोधन होत आहे. याचा उत्तमोत्तम फायदा देशाला अग्रेसर होण्यासाठी नक्कीच होणार आहे.

 

No comments