BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक
नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भूमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, महापालिकेचे अपर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, चंद्रकांत महामीने, जयप्रकाश जतेगावकर, शंकर बोऱ्हाडे, डॉ.कैलास कमोद, वसंत खैरनार, श्रीकांत बेनी,दत्ता पाटील, विनायक रानडे, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, लक्ष्मण सावजी, दिलीप खैरे यांच्यासह नाशिक शहरातील मान्यवर उपस्थित होते.
Post a comment