web-ads-yml-728x90

Breaking News

पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पुणे

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. काल रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. (संचारबंदीचं उल्लंघण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगारात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं. शहरांत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिस चौकशी करत होते. दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

No comments