web-ads-yml-728x90

Breaking News

103 वर्षाचा प्रोत्साहित, प्रेमळ झरेचा प्रवास अखेर थांबला

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

श्री हरी सेवा संस्थेतील विरार पूर्व  आपल्या कमिटीचे माजी अध्यक्ष श्री रघुनाथ सुतार यांच्या आई श्रीमंती -जानकी लक्ष्मण सुतार, गावच नाव सांगूळवाडी,तालुका वैभववाडी,जिल्हा सिंधुदुर्ग. यांचे १४-०२-२०२१ रोजी वयाच्या १०३ व्या वर्षी अल्पशा आजाराने आणि वृद्धपकाळाने विरार भाटपाडा येथे निधन झाले. त्यांच्यावर सार्वजनिक स्मशानभूमी विरार पश्चिम विराटनगर येथे काल  रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार केले गेले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. असे रघुनाथ सुतार यांनी सांगितले.

जीवन प्रवासात पडेल ते काम केलं आणि संसार उभा केला..पदरी पाच मुलं मोठा मुलगा जगन्नाथ लक्ष्मण सुतार. यांनी वयाच्या लहान वयात शेती आणि गुर राखणे हे स्वीकारलं कारण हे पाच भावंड आणि  यांची जवाबदारी होती कारण वडिलांनी लहान पनीच साथ सोडली निधन झालं..म्हणून यांची जवाबदारी  जानकी आज्जी यांच्यावर आली यांनी कंबर खचून   या सर्व पाखरांना मोठं केलं..प्रत्येकाला लढायला शिकवलं मोठं बनवलं प्रत्येकाचं  शिक्षण एवढं करता नाही आलं पण तीन नंबर भाऊ  वसंत सुतार यांनी 10 वी पर्यँत शिक्षण घेतलं सरकारी नोकरी लागली आजे ते त्यांच्या क्षेत्रात मोठं काम करत आहेत.दोन नंबर भाऊ रघुनाथ सुतार यांनी सुधा खूप संघर्षयमय प्रवास करून हे सुद्धा सरकारी नोकरी मिळाली आणि हे सुद्धा आपल्या क्षेत्रात काम करून निवृत्त आहेत..दोन मुलींनाही त्यांचा संसार उभा करून दिला. असे नातू राकेश सुतार यांनी सांगितले.

सांगायचा मुद्दा असा की जानकीबाई सुतार यांनी आपल्या कामाने कर्तृत्ववाने गावात नाव कमवल.आता ते विरार ला दोन नंबर मुलांकडे रघुनाथ सुतार यांच्याकडे राहत होत्या जवळ जवळ पाच वर्षे झाली यांनी सभाळ त्यात मोट्या मुलगा म्हणजेच जगन्नाथ सुतार यांचं निधन झालं.तरी सुद्धा जानकीबाई खचल्या नाही.भर कोरोनाच्या काळात सुद्धा तबेतीला झुंज दिली. आज आमच्या सारख्या तरुणांसाठी जानकीबाई हे उत्तम उद्धहरण आहेत आणि रहाणार.आम्ही नातू नाती यांना आजीने खूप प्रेम दिलं आज तिने घेतलेला मुखा खूप ताकत देऊन जात.येणाऱ्या भावी पिढी साठी आजी खूप मोठं उदाहरण आहे.असे नातू सचिन सुतार यांनी सांगितले.

 

 

No comments