0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे,असा विश्वास नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना दिला.

महानगरपालिका मैदान डवले नगर  येथे आयोजीत केलेल्या  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य - नाचणी, कार्यशाळा, प्रदर्शन व  विक्री स्टॉलचे  उद्घाटन  नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, महिला अर्थिक विकास अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहायक संचालक प्रमोद लहाने आदी  उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री .शिंदे म्हणाले की,विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन  मिळत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था  करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकरीबांधवांना याचा  फायदा होत आहे.कोरोना काळात शेतकऱ्याचे खुप नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनामार्शेफत शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असेही श्री शिंदे यांनी सांगितले. आजच्या या आठवडी बाजार ठिकाणी  ठाणे जिल्ह्यातील 31  शेतकऱ्यांनी आपले स्टॉल लावले होते .सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Post a Comment

 
Top