web-ads-yml-728x90

Breaking News

सायबर गुन्हेगारांचे नवीन वर्षात धाडस वाढले आता चक्क पत्रकाराचे facebook खाते हॅक ग्रामीण पोलीस संपादकांची आपले सरकार पोर्टल, सायबर गुन्हे येथे तक्रार

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर  |

सध्याच्या जगात असंख्य लोक सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आपली प्रतिक्रिया किंवा आपले मत मांडत असतात. व त्याच माध्यमातुन आपली एक वेगळी ओळंख निर्माण करतात. सध्याच्या युगात सर्वात जास्त प्रमाणामध्ये फेसबुक या सोशल मिडीयाचा वापर करतांना आपल्याला दिसून येते. फेसबुकच्या माध्यमातुन बरेच लोक देशातील व परदेशातील लोकांशी मैत्री करुंन त्यांच्याशी बोलत असतात. व्हिडिओ कॉल करत असतात. आपले वैयक्तिक फोटो फेसबुक अकाउंटवर शेअर करत असतात. व इतरही अनेक प्रकारचे चांगले व वाईट गोष्टी या माध्यमातुन करतात व केले जातात.

फेसबुक हे अ‍ॅप्लीकेशन मोठया प्रमाणावर नागरीक वापर करत आहेत. परंतु मोठया प्रमाणात नागरिकांचे फेसबुक अकाउंट हॅक करुंन त्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस हॅकर स्वतःकडे घेऊन अकाउंट युझर ला त्याचा अ‍ॅक्सेस त्यास परत देतो असे सांगुन पैशाची मागणी करत असतो व पैसे नाही दिले तर त्याचे फेसबुक अकाउंट वर अश्लिल फोटो व व्हिडिओ अपलोड केले जाते. व फेसबुक अकाउंट युझरच्या फ्रेंडलिस्ट मध्ये असणारे त्याचे मित्र व मैत्रिणींना अश्लिल भाषेत चॅट करुंन त्याची बदनामी करुंन त्यास मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात. नागरीकांचा वैयक्तिक फोटो किंवा वैयक्तिक महत्वाची माहिती व चॅटिंग असल्यामुळें तो घाबरुंन हॅकरला त्याने मागितलेले ५०००/- रुं किंवा १००००/- रुं पेटीअम, फोनपे, किंवा गुगल पे व इतर वॉलेटच्या सहाय्याने पैसे देत असतो. त्यामुळें सदर प्रकारामुळें बरेच नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागतात. असाच प्रकार अहोरात्र 24 तास जनतेस जनजागृती तसेच माहिती पुरवणारे 'पोलीस मित्र' म्हणून ओळख असणारे मराठी वृत्तपत्राचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांचे चक्क फेसबुक सोबत trucaller ही hack झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सायबर हल्ले वाढले आहे. हे हल्ले खोर आपल्या वयक्तिक स्वार्था करीता सामान्य जनतेबरोबर पोलीस, वृत्तपत्राचे संपादक यांना ही गंडा लावण्यास यशस्वी ठरताचे चित्र सध्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात दिसत आहे. हे डिजीटल गुन्हेगार यंत्रणाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत पोलीस निरीक्षक बरोबर वृत्तपत्राच्या संपादकांचे अधिकृत खाते हॅक करण्यास सायबर विजय पटकवत आहे. विविध नावाचा, चिन्हाचा, नंबर, जन्मतारीख त्याच बरोबर युट्युब वरील मोफत अभ्यास करून हे सायबर गुन्हेगार हल्ले करत आहे. याबाबत ग्रामीण पोलीस उल्हासनगर आवृत्तीचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांना विचारले असता त्यांनी संगितले. सदर सायबर हल्ले होणे जणू काही अधिक  पैसे कसे मिळवणारी सायबर डिजिटल फैशन झाली आहे. हा फसवणुकीचा प्रकार माझ्या सोबत घडला असून मला कळताच मी तात्काळ माझा पासवर्ड बदली केला असून याबाबत दि. 9 जानेवारी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कण्हयालाल थोरात यांना सदर प्रकार सांगितला व यावर सायबर अन्वेषण विभाग यांनाही लवकर लेखी तक्रार करणार आहे. असे सांगितले असे सायबर हल्ले रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र हेल्पलाईन  कक्ष असावा जेणे करून जनतेस तात्काळ मदत मिळत वेळेची बचत गुन्हेगारास विविध मार्ग मिळणार नाही. यावर जलद आळा बसेल.

No comments