BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
नवीन पिढी संस्कांरावर तयार होत असून त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी व शोषित आणि पीडित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भटके विमुक्त प्रवर्गातील सर्व समाजाने शिक्षण हा मुख्य आधार घटक लक्षात घेऊन वाटचाल करावी तसेच या समाजाच्या उन्नतीशी निगडीत सर्व मंत्रालयीन विभागांनी विकास योजनांची आखणी करून येणाऱ्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करावी अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या विमुक्त प्रवर्गातील महिलांच्या विविध समस्यांबाबत विधानभवन येथे ‘भटके विमुक्त महिला परिषद’ च्या अध्यक्षा डॉ. प्रियंका राठोड यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Post a comment