web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ प्रादेशिक परिवहन कार्यालय आयोजित ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

प्रादेशिक परिवहन कार्यालय  ठाणे तर्फे दरवर्षी होत असणारया राष्ट्रीय   रस्ता सुरक्षा अभियानाने  ३२  व्या वर्षात पदार्पण केले असून सोमवार १८ जानेवारी ते बुधवार १७ फेब्रुवारी २०२१  पर्यंत   दररोज होणारया    ३२ वा  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा  अभियानाचे  उद्घाटन सोमवार दि. १८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ :३० वा  नियोजन भवन  जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंड   कोर्ट नाका ठाणे (प )   येथे होत असून या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे  पालकमंत्री ठाणे जिल्हा तथा मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),आहेत तर  उद्घाटक मा. खा. श्री. कपिल पाटील लोकसभा सदस्य, भिवंडी  यांच्या हस्ते होणार आहे तसेच श्री. विवेक फणसळकर (भा.पो.से.)पोलीस आयुक्त, ठाणे शहर , मा.श्री. राजेश नार्वेकर (भा.प्र .से.) जिल्हाधिकारी, ठाणे मा. श्री. विक्रम देशमाने (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण  मा. श्री. रविंद्र गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे मा. श्री. विलास कांबळे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम , ठाणे मा. डॉ. कैलास पवार जिल्हा शल्यचिकित्सक ,ठाणे यांची  प्रमुख उपस्थितीती असणार  आहे 

असे श्री. जयंतकुमार पाटील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे श्री. विश्वंभर शिंदे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे सौ. हेमांगिनी पाटील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई श्री. तानाजी चव्हाण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण सर्व कार्यकारी अधिकारी व कर्मचारी वृंद प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे यांनी आपल्या निमंत्रण पत्रकात कळविले आहे

No comments