0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा, तसेच विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नंदकुमार काटकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, संभाजी होळकर तसेच  विविध विभागाचे अधिकारी-पदाधिकारी  उपस्थित होते.

Post a Comment

 
Top