web-ads-yml-728x90

Breaking News

जासई विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  उरण

उरण तालुक्यातील प्रसिद्ध  रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी तसेच हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील,  विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख,पर्यवेक्षक साळुंखे सर,सौ.पाटील एस्.एस,  सौ.पाटील एन.पी, सौ.पाटील एस्.सी, अतुल पाटील सर,गाताडी एस्.बी.तसेच विद्यालयातील सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments